
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे भोंगळ कारभाराविरोधात— तालुका भाजप पदाधिकाऱ्यांचे पवित्रा!
निवेदनाद्वारे मा.मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्याकडे समस्या त्वरित दूर करण्यासंबंधी मागणी.
कोरची :—
शिक्षण विभागातील भोंगळ कारभाराविरोधात भाजप च्या कोरची तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांद्वारे मुख्य कार्यपालन अधिकारी जि.प. गडचिरोली याना नुकतेच निवेदन सादर केले आहे, या निवेदनात भाजप ने मुख्य कार्यपालन अधिकारी यांना तालुक्यातील समस्यांची यादीच दिलेली आहे व या समस्या सोडविण्यासाठी त्वरित पाऊल उचलावे असे निवेदनात लिहिले आहे . newsjagar

कोरची तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षण विभागातील समस्या खालील प्रमाणे आहेत ते त्वरित सोडवण्यात यावी अशी मागणी मा. मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांना मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती कोरची यांच्यामार्फत निवेदनाद्वारे करण्यात आले.
१) केंद्र— देऊळभट्टी अंतर्गत बरेच शाळेतील विद्यार्थ्यांना पंधरा दिवसापासून अधिकारी— कर्मचारी यांचे निष्काळजीपणामुळे शालेय पोषण आहार बंद आहे. ते लवकरात लवकर सुरू करून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यात यावे.
२) तालुक्यात मागील दोन वर्षापासून ब्रह्मपुरी, देसाईगंज वडसा, आरमोरी यासारख्या ठिकाणाहून ३०किलोमीटर अंतरापेक्षा जास्त अंतरावरून ये—जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे घरभाडे बंद करून उचल केलेले घरभाडे रक्कम रिकव्हरी करण्यात यावी.
३) आरमोरी, देसाईगंज वडसा, ब्रम्हपुरी या शहारामधून दररोज ये—जा करणाऱ्या मुख्याध्यापक कर्मचारी शिक्षक यांच्यामुळे देऊळभट्टी केंद्रातील काही जिल्हा परिषद शाळा नेहमीच बंद राहतात बंद असणाऱ्या शाळेतील कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाही करण्यात यावी.
४) न्यायालयीन प्रकरणांमधून बदली पात्र शिक्षकांचे बदली झालेल्या शिक्षकांचे जागेवर जोपर्यंत बदली शिक्षक येत नाही तोपर्यंत न्यायालयात जाऊन बदली स्टे ( थांबवाणे) आणावे. जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.
५) जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढवण्यासाठी स्थानिक गावातील शिक्षकांनी उपाययोजना करून शिक्षण घेण्यासाठी बाहेर जिल्ह्यात आणि तालुक्यात खाजगी निवासी शाळेत गेलेले विद्यार्थ्यांना पालकांचे मदतीने वापस आणावेत. आणि गावच्या शाळेत शिक्षण घ्यावीत असे प्रयत्न करावे.
६) कामचुकार करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.
अन्यथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष बीजेपी कार्यकर्ते पदाधिकारी रस्त्यावर उतरेल, तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची परिस्थिती जर निर्माण झाली तर सर्वस्व जबाबदारी माननीय तुम्ही असणार आहात. असे निवेदनात म्हटलेले आहेत.
यावेळी तालुका भाजपचे पदाधिकारी तालुकाध्यक्ष श्री. सदाराम नुरुटी, जिल्हा सदस्य श्री.चिंताराम सोनफुल, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष श्री, अविनाश हारामी, महिला आघाडी तालुकाध्यक्षा सौ.शिलाताई सोनकोतरी, माजी सरपंचा तथा माजी महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा सौ. गिरीजाताई कोरेटी, शाळा व्यवस्थापन समिती कोटगुलच्या अध्यक्षा सौ. केवराबाई सोनफुल, महिला आघाडी जिल्हा सदस्य कु. सुगनाताई काटेंगे,तालुका सदस्य सौ. संगीता कोरेटी, सरपंचा सौ. शांती मडावी कोटरा तसेच तालुक्यातील भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

