AiktaTai Samarth

मूल : मूल नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाने दिलेल्या उमेदवारीवरून पक्षांतर्गत सुरू असलेल्या लाथाडयायांमुळे नगराध्यक्षपदाची उमेदवारी भाजपच्या अंगलट येण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. सामाजिक समीकरणे, स्थानिक पातळीवरची मैत्री-विरोध, पक्षातील गटबाजी आणि अनपेक्षित उमेदवारी घोषित झाल्यानंतर उभा राहिलेला नाराजीचा सुर भाजपसाठी अनुकुल नसल्याचे बोलल्या जात आहे. सध्यातरी कांग्रेसच्या ऐकता ताई समर्थ Aikta Prashant Samarth यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे भाजपने अपेक्षित असलेले एकमत किंवा प्रखर कार्यकर्ता समर्थन प्रत्यक्षात उमेदवारी जाहीर झाल्या पासून दिसत नसून उलटपक्षी कार्यकर्त्यांमध्ये ही उमेदवारी कुणाच्या दबावाखाली देण्यात आली? असा प्रश्न आता मोठ्या प्रमाणावर विचारला जात आहे. विशेषतः शिक्षित, तरुण आणि स्थानिक पातळीवर लोकप्रिय असलेल्या पर्यायी नावांना दुर्लक्षित करत अचानक एका उमेदवाराची निवड केल्याने कार्यकर्त्यांची नाराजी अधिकच वाढल्याचे समजते. स्थानिक पातळीवर भाजपचे काही नेते एकमेकांच्या विरोधात थेट मैदानात उतरले असून प्रभागांमध्ये गुप्तपणे विरोधी हवा तयार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. उमेदवारी मिळाल्या पासून उमेदवारापेक्षा नाराज कार्यकर्तेच जास्त दिसत आहेत, अशी टीका काही माजी पदाधिका-यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केली आहे. सामाजिक समीकरणांच्या दृष्टीने पाहता, नगराध्यक्ष पदासाठी ज्या समाज घटकाचा पाठिंबा निर्णायक ठरतो त्या प्रमुख घटकांमध्ये भाजप उमेदवाराविषयी अद्याप विश्वास निर्माण झालेला दिसत नाही. विशेषतः महिला, शेतकरी, कामगार आणि मध्यवर्गीय मतदारांमध्ये उमेदवाराचे व्यक्तिमत्व, अनुभव आणि स्थानिक समस्यांवरील पकड याबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याउलट प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तात्काळ एकजुटता दाखवत प्रचाराची तयारी सुरू केली असून त्यांचा जमिनीवरील एकत्रितपणा भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे. भाजपच्या आतल्या घरातच सुरू असलेला विरोधाचा आवाज जर असाच वाढत गेला, तर नगराध्यक्ष पदाची उमेदवारी पक्षाच्या अंगलट येणे नक्की असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत असून दुसरीकडे मात्र काँग्रेसच्या सौ. एकता समर्थ यांच्या पाठीशी त्यांचे पती प्रशांत समर्थ यांनी नगर सेवक म्हणून आजपर्यंत केलेल्या कार्याची शिदोरी, त्यांचा मनमिळावू स्वभाव, सहकार्याची भूमीका आणि विस्तारलेला मित्र परिवार त्यांच्या पाठीशी आहे. दुसरीकडे नगराध्यक्ष पदावर निर्वाचित झाल्यानंतर शहर विकासासाठी कोण अधिक वेळ देवू शकेल, याचीही मतदारांमध्यें चर्चा रंगत असतांना दिसत आहे. भाजपा मध्यें मोठया प्रमाणांत कुरघोड्या आणि नाराजीचा सुर दिसून येत असल्याने सध्यास्थितीत सट्टा बाजारातही काँग्रेसचा पारडा जड असल्याचे ऐकीव्यात आहे. newsjagar
बाहेरून आलेले म्हणून विरोधकांनी प्रचार करून काँगेसच्या गोटात आग लावण्याचं प्रयत्न केला पण काँग्रेस पक्ष श्रेष्टींनीं पत्रक काढून समर्थ यांची उमेदवारी ही “नुकतेच आले म्हणून नाही”, तर “जिंकण्याची क्षमता सिद्ध केली म्हणून” काँग्रेसच्या जुन्या व नव्या दमाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून देण्यात आली. त्यामूळे निष्ठावान कार्यकर्ते दुखावलेले, या म्हणण्यात अर्थ नसुन उलट कार्यकर्त्यांचेच मत पक्षाने मान्य केल्याने सर्व कार्यकर्ते समाधानी असल्याचा दावा तालुका अध्यक्ष गुरू गुरनुले आणि शहर अध्यक्ष सुनिल शेरकी यांनी केला आहे. आमच्या कार्यकर्त्यामध्ये या बाबत कुठलाही विरोध नाही. या बाबत सांगतांना काँग्रेसच्या स्थानिक ज्येष्ठ नेत्याने अनेक प्रभागांमधील कार्यकर्त्यांनी स्वतःच प्रशांत समर्थ Prashant Samarth यांचं नाव पुढे केल्याने समर्थ दाम्प्त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करत उमेदवारी जाहीर केली. समर्थ यांची प्रतिमा, नागरिकांशी असलेला थेट संपर्क, आणि विविध सामाजिक उपक्रमातील सक्रिय सहभाग यामुळे ते विजयी उमेदवार म्हणून उभे राहत असल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणात निघाल्याने पराभवाच्या भितीपोटी बिनबुडाचे आरोप लावल्या जात असल्याचेही त्यांनी सांगीतले.
काँग्रेसमध्ये कुठलेही बंड नाही आणि कार्यकर्ते नाराज नसून, समर्थ यांची वाढता जनप्रभाव लक्षात येता विरोधक नकारात्मक प्रचार करत असल्याचे काँग्रेस चे म्हणणे आहे, मूल काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह सतत वाढत आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर-काँग्रेसच्या बैठका गजबजल्या, कार्यकर्ते अधिक सक्रिय झाले, महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसू लागली. म्हणजेच “काँग्रेस उफाळली” हा आरोप खरा आहे… पण उफाळली नाराजीने नाही तर उत्साहाने! – मूल शहरात काँग्रेसची घसरगुंडी नव्हे; तर मजबूत रणनीतीमुळे काँग्रेसची लढत अधिक भक्कम आहे, हे काँग्रेस सूत्रांनी स्पष्ट केले आहे.


