
आदिवासी एकता युवा समिती तर्फे बिरसा मुंडा चौक येथे जननायक बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
गडचिरोली – गडचिरोली येथील क्रांतिवीर बिरसा मुंडा चौक गोकुळनगर येथे आदिवासी एकता युवा समितीच्या वतीने जननायक बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली.
या वेळी समितीचे अध्यक्ष अमोल कुळमेथे, माजी अध्यक्ष उमेश उईके, परिषदेचे उपाध्यक्ष देवराव आलाम, तसेच दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष मुकुंदराव उंदीरवाडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित राहिले. उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना डॉ. देवराव होळी म्हणाले की, “जननायक बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी दिलेला संघर्ष आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या आदर्शांवर चालून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. केंद्र सरकार तर्फे जननायक बिरसा मुंडा यांच्या 150 वी जयंती देशभर जनजाती गौरव दिन म्हणून साजरी करण्यात येते आहे. त्या अनुषंगाने समाजाने बिरसा मुंडा यांच्या संघर्षाचा आदर्श घेऊन समाजावर होत असलेल्या अन्याया विरुद्ध एकजुटीने उभे राहणे गरजेचे आहे.”
कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन समितीचे सचिव प्रदीप कुळसंगे यांनी केले. कार्यक्रमांस समितीचे उपाध्यक्ष सुधीर मसराम, सहसचिव गिरीश उईके, संजय मसराम, प्रियदर्शन मडावी, प्रफुल्ल कोडाप, आरती कोल्हे, अन्नपूर्णा सिडाम, हेमाताई कुळसंगे, रिद्धीमा कुळसंगे, डॉ. कीर्तिकुमार उईके, नागोराव उईके, निलेश कोडापे, बाबुराव सिडाम आदी समाजबंधव उपस्थित होते. सदर बिरसा मुंडा जयंतीचा कार्यक्रम मोठया उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

