
अमरावतीत महिला शेतकऱ्याने घेतला घरीच गळफास
बुलढाणा / अमरावती – अमरावती जिल्ह्यातील जावरा मोळवण (ता. नांदगावखंडेश्वर) येथे एका महिला शेतकऱ्याने, तर बुलढाणा जिल्ह्यातील शिंदी (ता. सिंदखेडराजा) येथे एका वृद्ध शेतकऱ्याने तसेच कारंजा तालुक्यातील शेतकऱ्याने मृत्यूला जवळ केले.
जावरा मोळवण येथील माला महादेव मेश्राम (वय ५२) या महिला शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. महिलेने शेतीच्या कामासाठी पैसे घेतले होते. परंतु शेतात पीक न झाल्यामुळे पैसे कसे परत करायचे, या चिंतेत सदर महिला असल्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, असे मृत महिला शेतकऱ्याच्या पतीने नांदगावखंडेश्वर पोलिसांना सांगितले.
या प्रकरणी पोलिस तपास करीत आहे. कीटकनाशक घेऊन आत्महत्या साखरखेर्डा : येथून जवळच असलेल्या शिंदी येथील ६५ वर्षीय शेतकऱ्याने ऐन दीपावळीच्या दिवशी शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. परिसरात या हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांचे संपूर्ण नुकसान परिणामी डोक्यावर असलेला कर्जाचा भार कमी करण्याची क्षमता नसल्याने शिंदी येथील या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली असल्याचे वृत्त आहे.

शिंदी येथील शिवाजी माणिकराव बुरकुल (वय ६५) असे या शेतकऱ्यांचे नाव आहे. शिवाजी बुरकुल हे शेतात गेले असता दुपारच्या सुमारास त्यांनी विषारी औषध प्राशन केले. वडील घरी कां आले नाहीत म्हणून मुले शेताकडे गेले असता ते अत्यवस्थ अवस्थेत
राज्य शासनाने खासगी पतसंस्था, सहकारी बँका, भारतीय स्टेट बँक यांची कर्जवसुली मोहीम त्वरित थांबवावी. जेणेकरून शेतकरी आत्महत्येकडे वळणार नाहीत. अन्यथा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. – रामभाऊ जाधव, माजी उपाध्यक्ष, जि.प. बुलडाणा.
दिवाळीच्या दिवशी संपविले जीवन कारंजा : तालुक्यातील दुघोरा येथील अल्पभूधारक शेतकरी वासुदेव नारायण भगत (वय ७५) यांनी सततची नापिकी, सरकारी कर्ज आणि गरिबीला कंटाळून आपले राहत्या घरी ता. २१ ऑक्टोबर रोजीच्या मध्यरात्री आत्महत्या केली. एकरी दोन क्विंटल सोयाबीनचा उतारा, खर्च एकरी बारा हजार सोयाबीनला दर क्विंटलला साडेतीन हजार, डोईवर कर्ज, त्यात दिवाळीचे आगमन इतक्या संकटाचा सामना करण्याची ताकद आता शेतकऱ्यांत उरली नसल्याचा दुर्दैवी प्रत्यय येत आहे. प्राप्त माहितीनुसार त्यांनी स्वतःला आपल्या घरामध्ये दोरीने गळफास लावून स्वतःचे जीवन संपविले. त्यांच्या मागे तीन मुले असून, त्यातील मधल्या मुलाने सुद्धा फाशी घेऊन चार ते पाच वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. दोन मुले, तीन सुना, नातू असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. जर शासनाने ओला दुष्काळ कर्जमाफी केली असती, तर सदर कास्तकारावर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती अशी जनतेमध्ये चर्चा सुरू आहे. पुढील चौकशी ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात उंबर्डा बाजार चौकीचे पोलिस कर्मचारी करीत आहे.
दिसून आले आणि त्यांच्या बाजूला कीटकनाशकाची बाटली आढळून आली. त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याचा मुलांना संशय आला. मुलांनी त्यांना प्रथम साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथून त्यांना बुलडाणा येते जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथेच उपचार सुरू असताना बुधवारी (ता. २२ ऑक्टो.) दुपारी त्यांचे निधन झाले. बुरकुल यांच्यावर एका खासगी पतसंस्थेचे ३ लाख कर्ज असून कर्ज वसुलीसाठी पतसंस्थेने नोटीस बजावली होती. यावर्षी शिंदी येथे अतिवृष्टीमुळे शिंदी भागातील शेती खरडून गेली आहे. पीक काढणीला आले असता पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने सोयाबीन शेंगाला कोंब फुटल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यात खासगी पतसंस्थेची पठाणी वसुलीमुळे शेतकरी वैतागले आहेत. शिवाजी बुरकुल यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

