
सोनू वाळके,जिल्हाप्रतिनिधी.
चामोर्शी:-
स्थानिक चामोर्शी येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील रामाळा येथील उदयोन्मुख खेळाडू कु. तनमय सोमा करेवार याने उत्कृष्ट कामगिरी करत ४५ ते ४८ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले.
अंतिम फेरीत दमदार उत्कृष्टरित्या खेळ करत त्याने प्रतिस्पर्ध्यांवर मात करून प्रथम क्रमांक मिळवला.

या यशामुळे तन्मयची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली असून त्याच्या उलेखनीय कामगिरीबद्दल गावभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
युवा संकल्प संस्थेतर्फे तन्मय करेवार याचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सहारे, भूषण सातपुते, सोमा करेवार, युवा संकल्प बहुउद्देशीय संस्था चे धडाडीचे संस्थापक राहुल वैरागडे तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उदयोन्मुख खेळाडू तन्मयच्या या यशामुळे परिसरातील तरुणांमध्ये खेळांविषयी नवी प्रेरणा निर्माण झाली आहे.

