
एटापल्ली – एटापल्ली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित तालुकानिहाय आढावा बैठक गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ ब्राह्मणवाडे, अहेरी विधानसभा निरीक्षक संतोषजी रावत आणि काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा माजी जि. पं. अध्यक्ष अजय भाऊ कंकडलावार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकांसह (स्थानिक स्वराज संस्थांच्या) निवडणुकांबाबत संघटन बळकट करण्यासाठी मार्गदर्शन केले गेले आणि सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी हनुमंत मडावी,एटापली तालुका अध्यक्ष रमेश गंपावार, नगरसेवक किसान हिचामी, नगरसेवक निजान पेंदाम, शराध्यक्ष सतीश मोप्पलवार, गुरुभाऊ गुरनुले,बंटी जुनगरे, प्रज्वल नागूलवार,अनिल तेलकुंटवार,तानाजी धुर्वा, नगराध्यक्ष सौं.दीपयंती पेंदाम, महिला तालुका अध्यक्ष सौं.ताराताई गावडे, सौं.ममताताई धुर्वा यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


