
वर्धा – वर्धा शहराच्या अगदी जवळच असलेल्या सेलूकाटे येथील नवोदय विद्यालयातील सुमारे १९ विद्यार्थ्यांची अचानक प्रकृर्ती ढाळसल्याने त्यांच्यावर आरोग्य विभागाच्या चमूद्वारे उपचार करण्यात आले आहे.
प्रकृर्ती ढासळलेल्या या विद्यार्थ्यांपैकी काहींना शनिवारी रात्री तर काहींना रविवारी सकाळी अतिसाराचा त्रास झाला. सध्या सर्वांची प्रकृर्ती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. दुषित पाण्याने विद्यार्थ्यांना त्रास झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सेलूकाटे येथील नवोदय विद्यालयात जवळपास ५५० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्या विद्यार्थ्यांना सायंकाळी वेज आणि नॉनवेज जेवन देण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी जेवनादरम्यान वेज तर काहींनी विद्यार्थ्यांनी नॉनवेज भोजन केले. शनिवारी सुमारे दहा तर रविवारी सकाळी सुमारे ९ विद्यार्थ्यांची प्रकृर्ती अचानक ढासळली व त्यांना अतिसारचा त्रास जाणवला. ही बाब लक्षात येताच तातडीने आरोग्य विभागाला याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांनी तातडीने सेलूकाटे येथील नवोदय विद्यालय गाठून विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले. सध्या या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृर्ती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच खा. अमर काळे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांना माहिती दिली. अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे यांनी सेलूकाटे येथील नवोदय विद्यालय जाऊन अन्न-धान्य व तेल आदीचे नमुने घेत ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले.पालकांकडून अनेकदा तक्रार करुनही नवोदय विद्यालय प्रशासन तक्रारीची दखल घेत नसल्याने अनेक पालकांनी आपल्या पाल्यांच्या सुरक्षितते विषयी चिंता व्यत केली आहे. यापूर्वीही जिल्ह्यात विद्यार्थ्यांना दिल्या जात असलेल्या अन्नातून विषबाधेचा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले होते. विद्यार्थ्यांच्या वसतीगृहातील अन्नातून असे प्रकार होणे हा चिंतेचा विषय आहे. या बाबी प्रशासनाने गंभीरतेने घेऊन भविष्यात असे प्रकार घडणार नाही याची दखल घेणे गरजेचे असल्याचे खा. अमर काळे यांनी प्रसिद्धी पत्रकातून कळवले आहे.


