
सोनू वाळके,जिल्हाप्रतिनिधी.
प्रेस नोट
नदी शिवाय दुसरा पर्याय नाही , छातीभर पाण्यातून प्रवास.

अहेरी:-
अहेरीपासून अवघ्या 10 किमी अंतरावर असलेल्या खेमनचेरू टोला या गावात जाण्यासाठी आजही नदीवर पुलिया नाही, रस्ता नाही. पावसाळ्यात तब्बल पाच महिने रस्ता बंद होतो, गावकरी छाती एवढ्या पाण्यातून प्रवास करण्यास बाध्य होतात. केवळ दोन महिनेच दुचाकीने प्रवास शक्य असून उर्वरित 8-10 महिने गावात दुचाकी नेता येत नाही. पावसाळ्यात रुग्णालयात कुणाला तातडीने न्यायचे असल्यास ते शक्य होत नाही व अशावेळी जीव गमावण्याची वेळ गावकऱ्यांवर येते.
अहेरीमध्येच अनेक वर्षांपासून मंत्री व पालकमंत्री राहिलेले बाबा आत्राम, माजी आमदार दीपक आत्राम, राजे अंबरीश महाराज, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार व भाग्यश्री आत्राम यांचे वास्तव्य असूनही त्यांच्या घरापासून अवघ्या 10-12 किमी अंतरावर असलेल्या खेमनचेरू गावात साधी पुलिया व रस्ता नाही. “गावकऱ्यांना विकासापासून वंचित ठेवणाऱ्या अशा नेत्यांना विकासाच्या बाता करण्याचा काहीही अधिकार नाही”, असा हल्लाबोल आजाद समाज पार्टी जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी केला.
गावाकऱ्यांच्या तक्रारीवरून आजाद समाज पक्षाची टीम खेमनचेरू येथे जाऊन पाहणी केली असता, स्वातंत्र्यानंतर आजवर गावात पुलियाच न झाल्याने गावकरी प्रचंड त्रस्त असल्याचे उघड झाले. सरपंच कायलू मडावी यांच्या म्हणण्यानुसार, खेमनचेरूपासून टोला सुमारे 2 किमीवर असून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या काळात पुलिया साठी तपासणी व आखणी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केली होती. मात्र गाव VR नसल्याने सांगून त्यावर पुढे काय कार्यवाही झाली ते कळले नाही त्यानंतर कोणत्याही लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला नाही, असे सरपंच यांनी सांगितले.
अनेक मंत्री पद, पालकमंत्री पद भूषविणारे जर गावाच्या बाजूचा विकास करु शकत नाही, समस्या सोडवू शकत नाही. यावर आजाद समाज पार्टीने थेट मंत्री बाबा आत्राम यांनाच जबाबदार धरले.
यावेळी गावातील नागरिकांसह आजाद समाज पक्षाच्या महिला अध्यक्ष सोनाशी लभाने, युवा अध्यक्ष विवेक खोब्रागडे, अहेरी विधानसभा अध्यक्ष किशोर बोरकर, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार, रामगू मडावी, गडचिरोली युवा तालुकाध्यक्ष नितेश वेस्कडे इतर गावकरी उपस्थित होते.

