
सोनू वाळके, जिल्हाप्रतिनिधी,
धानोरा
धानोरा तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांना घेऊन धानोरा तालुका काँग्रेसच्या वतीने येरकडं येते रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. धानोरा तालुक्यातील नागरिक व शेतकरी यांच्या मूलभूत समस्यांकडे शासन व प्रशासनाने केलेले संपूर्ण दुर्लक्ष आता जनतेला असह्य झाले आहे. अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था, अपूर्ण सिंचन सुविधा, विस्कळीत आरोग्य व्यवस्था, शिक्षण क्षेत्रातील दुर्लक्ष, तसेच रोजगाराच्या संधींचा अभाव यांसारख्या गंभीर प्रश्नांवर कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. शासन केवळ कागदावर आणि आश्वासनांपुरते मर्यादित राहिल्यामुळे जनतेत तीव्र रोष निर्माण झाला आहे.#newsjagar

या सर्व प्रश्नांचा निषेध म्हणून येरकड येथे मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येऊन शासनाविरोधात रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान साहेब MP Dr. Namdeo Kirsan, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ ब्राह्मणवाडे आणि निरीक्षक गडचिरोली विधानसभा संदेशजी सिंगलकर, माजी जि. पं. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, तालुका अध्यक्ष प्रशांत कोराम, महिला जिल्हाध्यक्षा ऍड. कविता मोहरकर, किसान सेल जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे, लालाजी धुर्वे, सौं.रुकमाबाई धुर्वे, सौं.शेवंता हलामी,कुलदीप इंदूरकर, शेरखा पठाण, लक्षुमण डोकरमारे, सखाराम नैताम, भास्कर मेश्राम, शालिक पर्सा, एकनाथ काटेंगे, दिवकर उशेंडी, मादगू आतला, शिवप्रसाद गवर्णा, काँग्रेस पदाधिकारी, शेतकरी, मजूर, युवक, कार्यकर्ते तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

