
सोनू वाळके, जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामाबाबत, चुकीच्या नियोजनाबाबत आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या मनमानीविरोधात आज भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत आम्ही जनतेचा आवाज बुलंद केला.

धानोरा व चामोर्शी तालुक्यातील शेकडो नागरिकांना या दुर्व्यवस्थेचा फटका बसत असून वाहतुकीत होणारा अडथळा, अपघातांचा धोका आणि लोकांच्या सुरक्षिततेशी होत असलेला खेळ या सर्वाचा आम्ही तीव्र निषेध नोंदवला.
गडचिरोलीकरांच्या हक्कांसाठी, रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी व सुरक्षित प्रवासासाठी आमची लढाई सुरूच राहील. #newsjagar
वारंवार राष्ट्रीय महामार्ग यांच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने अखेर आज मिलिंद नरोटे आमदार milind narote हे स्वतः विविध पदाधिकारी यांना घेऊन राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात जाऊन थेट धडक देत हिशोब विचारावा लागला. दरम्यान काही अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित होते. काही अधिकारी व कर्मचारी यांच्या कुचकामी कर्तव्य दक्षतेचे ही प्रत्यक्ष अनुभव आले. अशा अधिकारी व कर्मचारी यांच्या वर ही काय कार्यवाही केली जाणार या कडे जनतेची उत्सुकता लागली आहे.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर, भाजपा जिल्हा सचिव सारंगजी साळवे, भाजपा गडचिरोली ग्रामीण तालुकाध्यक्ष दत्ततुझी सूत्रपवार, गडचिरोली शहराध्यक्ष अनिलजी कुनघाडकर, धानोरा तालुकाध्यक्ष साजनजी गुंडावार, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकरजी भांडेकर, भाजयुमो जिल्हा महामंत्री आकाशजी सातपुते, भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रशांतजी कोटगले, भाजयुमो शहराध्यक्ष साई सिलमवार, नगरसेवक धानोरा संजयजी कुंडू व सहकारी उपस्थित होते.

