सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
गडचिरोली – राष्ट्रीय जाती – जनजाती विकास परिषदची बैठक कॉम्प्लेक्स स्तिथ सर्कीट हाऊस गडचिरोली येथे राष्ट्रीय जाती – जनजाती विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रविजी सोमकुंवर नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली तर राष्ट्रीय जाती – जनजाती विकास परिषदेचे राष्ट्रीय संघटन सचिव माजी आमदार डॉ. देवराव होळी, प्रदेश महासचिव डॉ. रुषीकेश मेश्राम नागपुर, डॉ. मुकुंदा जोगवलकर नागपूर, आरपिआयचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.
याप्रसंगी माजी आमदार डॉ. देवराव होळी म्हणाले की एस. सी एस टी जनजातीचे लोक एकत्र येऊन ह्या गैरराजकीय, गैरधार्मिक मुलनिवासी लोक ह्या सामाजिक संघटनेशी जुळलो तर आपले सामाजिक प्रश्न एकत्रित येण्याने सुटतील व एकत्रितपणे कार्यक्रमही घेता येईल यात संविधानाचे वाचन बिरसा मुंडा जयंती महिला दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पर्यावरण दिन संविधान मिशन असे विविध उपक्रम राष्ट्रीय जाती – जनजाती विकास परिषदद्वारे राबविता येतील.
प्रा. मुनिश्वर बोरकर म्हणाले की ह्या जुनीच परिषद असुन उद्येश चांगला आहे.आतापर्यंत कांग्रेसवाल्यांनी अश्या प्रकारचा कार्यक्रम घेतला नाही परंतु डॉ. होळीनी मुलनिवासींना एका मंचावर आणण्याचे कार्य केलेले आहे. परंतु सदर कार्यक्रमास मागेपुढे डॉ. होळीनी राजकीय रंग वापरू नये. याप्रसंगी डॉ. रुषीकेश मेश्राम डॉ.जोगलकर यांनीही मार्गदर्शन केले .
तर कार्यक्रमाचे अध्यक्ष रविजी सोमकुवर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेल्या संविधानामुळे आरक्षण मिळाळे आज आरक्षण संपविण्याची भाषा राजकिय पक्षाकडून होतांना दिसते तेव्हा संविधानाचा लढा आरक्षणाचा लढा अनु.जाती अनु जमाती यांच्यावर होणारा अन्याय अत्याचाराचा लढा एकत्रितपणे लढवून आपले हक्क व अधिकार मिळवून घेण्याकरीता हि संघटना काम करणार आहे तेव्हा मुलनिवासी बांधवांनी एकत्र येण्याचे आवाहनही सोमकुंवर यांनी केले. सदर कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन उमेशभाऊ उईके यांनी मानले .
या बैठकीला राजकुमार घोडेश्वार , हरिदास ढेंभुर्णे, दशरथ साखरे, विकास दहिवले, प्रा. कांबळे, मारोती भैसारे, धर्मराज कुकडकर, आनंद कंगाले, गुलाबराव मडावी, देवराव अलाम, सुरज मडावी, निलेश आत्राम, लक्षमण रामटेके, जांभुळकर सर, उंदिरवाडे सर, पुप्पलता कुमरे, मालता पुडो, विद्या दुगा, आरती कोल्हे, स्मिता नैताम, रेखा तोडासे, रोहिनी मसराम, माधुरी पतोडी, तनुजा कुमरे, सुरज मडावी, निलेश आत्राम, अमोल कुळमेथे, पवन गेडाम आदि सहीत बहुसंख मुलनिवासी समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन उमेशभाऊ उईके यांनी मानले .
