
सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
चामोर्शी-
यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी येथील वर्ग 7वीचा विद्यार्थी क्रिश संजय धोडरे तालुकास्तरीय शालेय कराटे क्रिडा स्पर्धेमध्ये अंडर 14 वयोगटात मध्ये वजन 45 कि.ग्रॅ या प्रकारात चामोर्शी तालुक्यात अव्वल ठरला असुन जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी त्याची निवड झालेली आहे.
त्याच्या यशाबद्दल राहुल लोक विकास मंडळाच्या अध्यक्षा कौशल्या सहारे, सचिव विवेक सहारे , कोषाध्यक्ष वक्टुजी उंदिरवाडे , सदस्या रेखा साखरे , माणिक साखरे , प्राचार्य शाम रामटेके, तसेच जेष्ठ शिक्षक राजू धोडरे, गुरुदेव सातपुते, निलेश क्षीरसागर ,लोकनाथ दुधबळे, सरिता आखाडे, जयश्री कोठारे ,
प्रा. प्रेमानंद वालदे , प्रा. प्रदीप भांडेकर, प्रा. प्रवीण गव्हारे , , लक्ष्मण गव्हारे,
यांनी क्रिश धोडरे आणि क्रिडा शिक्षक प्रविण नैताम यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

