
सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी झोपेत
– आजाद समाज पार्टी आवाज उठवणार
धानोरा: तालुक्यातील पेंढरी पुढे दुर्गापूर – सोमलपूर दरम्यान मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत 4.400 km च्या रस्त्याचे काम नुकतेच तीन महिन्यापूर्वी गुप्ता कँन्स्ट्रक्शन कंपनीच्या मार्फत करण्यात आले. परंतु रस्त्याची पाहणी केल्यास काम इतके बोगस व निकृष्ट दर्जाचे होते की अवघ्या तीन महिन्यात रस्ता उकरून निघाला. डांबर व इतर साहित्याचा वापर अत्यंत कमी केल्याने रस्त्याची दुर्दशा झाली असा आरोप दुर्गापूर ग्रामवासियांनी केली.

आजाद समाज पक्षाकडे तक्रार प्राप्त होताच आजाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हाप्रभारी विनोद मडावी व जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांच्या नेतृत्वात गावात भेट देण्यात आली. यावेळी गावातील सरपंच परमेश्वर गावडे यांना घेऊन पाहणी केली असता रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचे समजले. तसेच मार्गांवरील पलसगाव येथे सिमेंट रोड इस्टीमेट मध्ये मंजूर असताना कोणतेही काम झाले नाही.
गुप्ता कँन्स्ट्रक्शन कंपनी व प्रशासकीय अधिकारी यांनी यामध्ये मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप आजाद समाज पार्टी पदाधिकाऱ्यांनी केला. याविरोधात त्वरीत उच्च स्तरीय चौकशची मागणी करून जर उचित कार्यवाही नाही झाली तर आजाद समाज पार्टी तीव्र आंदोलन करेल असा इशारा जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी दिला.
यावेळी पक्षाचे पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते.

