
सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
गडचिरोली :-
एक गाव, एक वाचनालय – गडचिरोली पोलीस दलाच्या ७२ व्या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन
अतिदुर्गम भागातही शिक्षणाचा दीप प्रज्वलित करत…
गडचिरोली पोलीस दलाकडून मौजा जिजगाव (पोस्टे मन्नेराजाराम हद्दी) येथे ७२ व्या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन व लोकार्पण पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते पार पडले.

ग्रंथदिंडीत राष्ट्रध्वज फडकवत विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग – दुर्गम भागात ज्ञानाचा नवा उत्सव!
या उपक्रमातून
विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीला प्रोत्साहन
स्पर्धा परीक्षांविषयी जागरूकता
सुशिक्षित बेरोजगार, महिला-पुरुषांना ज्ञान व कौशल्य विकासाची संधी
दुर्गम भागातील नागरिकांना शासनाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न
एक गाव, एक वाचनालय” उपक्रम गडचिरोलीसाठी नवा परिवर्तनाचा मार्ग ठरत आहे

