
अमोल मारकवार | तालुका प्रतिनिधी

अहेरी : बौद्ध समाजाच्या वतीने आयोजित ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.या सोहळ्याला बौद्ध समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.ध्वजारोहण, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन तसेच त्यांच्या विचारांचे प्रबोधन अशा विविध कार्यक्रमांनी सोहळ्याची शोभा वाढविली.
अहेरीच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या दसरा व विजयादशमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांची उपस्थिती हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले.

दरवर्षीच्या परंपरेनुसार पालखीसह बुद्धविहार परिसरात दाखल झालेल्या राजे अम्ब्रीशराव महाराज यांचे बौद्ध समाजबांधवांनी उत्साहात स्वागत केले. यावेळी त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आदरांजली वाहिली.
याप्रसंगी उपस्थित समाजबांधवांना संबोधित करताना राजे अम्ब्रीशराव महाराज म्हणाले की, बौद्ध समाजाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असून, समाजाला आवश्यक असलेली सर्वतोपरी मदत करण्यासाठी आपण नेहमीच तत्पर राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी बौध्द समाजाचे अध्यक्ष एकनाथ चांदेकर, सहसचिव प्रशांत भिमटे, संजय ओंडारे, विजय ढोलगे ,गजानन ओंडारे, सुरेश दुर्गे, मिलिंद अलोणे, चेतन अलोणे, परशुराम दहगावकर
तसेच बौद्ध समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

