
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली/देसाईगंज : ‘रक्तदान हेच जीवनदान’ या मानवतावादी भावनेतून गरजू रुग्णासाठी रक्ताची मदत करण्यात आली. रश्मी नास्तिक खुणे, रा. आंबेडकर वार्ड, देसाईगंज या रुग्णावर ग्रामीण रुग्णालय, देसाईगंज येथे उपचार सुरू असून त्यांना O+ रक्तगटाची आवश्यकता होती.
रुग्णाच्या गरजेची माहिती मिळताच संबंधितांनी तातडीने पुढाकार घेत रक्ताची व्यवस्था करण्यासाठी सहकार्य केले. या मदतीमुळे रुग्णाला आवश्यक वेळी रक्त उपलब्ध होण्यास मदत झाली.

या उपक्रमासाठी आमदार रामदास मसराम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच सागर वाढई आणि लंकेश ढोरे यांनी विशेष सहकार्य केले.
रक्ताची गरज असलेल्या रुग्णांसाठी वेळेवर केलेली रक्ताची मदत ही केवळ मदत नसून एखाद्याचे जीवन वाचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. त्यामुळे समाजातील नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले.
“आपली छोटीशी मदत, कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकते. रक्तदान करा… जीवनदान द्या!”

