चंद्रपूर.(वि प्र) :- चंद्रपूर माना टेकडी परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे असल्याने हा परिसर निसर्गरम्य आहे. त्यामुळे या परिसरात शहरातील अनेक नागरीक भ्रमंतीसाठी येत आहेत. परंतू गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असल्याने या परिसरातील निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. हा परिसर वनसदृस्य असल्याने येथे मोरांचेही वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. मात्र काही दिवसांपासून येथील मोरांच्या संख्येतही घट झालेली पाहावयास मिळत आहे. त्यांच्या संख्येत घट होत असल्याने त्यांची शिकार होत असल्याची शंका होत आहे. या वर आळा घालाण्याची मागीणी माना निसर्ग भ्रमण मंडळाचे अध्यक्ष अनुप चिवंडे.
माना टेकडी परिसरात मोठ्या प्रमाणात झोड-झुडपे असल्याने या परिसरातील निरामय वातावरण असल्याने परिसरातील मुख्सत्वे महानगरातील नागरीक मोठया प्रमाणात भ्रमंती व व्यायामासाठी येथे येत असतात. परंतू गेल्या अनेक महिन्यांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरु असून याबाबत प्रशासनला वारवार निवेदन देऊन सुध्दा स्थानिक प्रशासन आणि वनविभाग अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे. अशाच प्रकारे मोठया प्रमाणात वृक्षतोड होत राहिल्यास या परिसराची रया गेल्याशिवाय राहणार नाही अशी भीती आहे. वृक्षतोड होत असल्याचे दिसल्यास कुणी त्यांना तसे करण्यास मज्जाव केल्यास सदर वृक्षतोड करणारी व्यक्ती हुज्जत घालतान नुकतेच आमच्या माना निसर्गभ्रमंती मंडळाच्या सदस्यावर ही मारहाण करण्याच्या उद्देशाने एक इसम धावूनही आला होता. तरी या अवैध वृक्षतोडी विरोधात प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे आपणांस करीत