
Pradip Walke
जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना निवेदन देऊन कारवाईची केली मागणी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा.
चंद्रपूर:-
मुल पोंभुर्णा तालुक्यातील रेती घाटातून रेती उत्खनन व स्टॉकच्या मंजुरीपेक्षा कितीतरी पट सध्या रेती स्टॉक असल्याने त्या रेती घाट धारकावर दंडात्मक व फौजदारी दंडात्मक कारवाई करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना मनसे स्टाईल आंदोलन करेन असा इशारा मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश वासालवार यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे, यावेळी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्ह्यात सन 2025-26 या वर्षांमध्ये लिलावाकारिता योग्य रेती घाटांची यादी जाहीर करण्यात आली त्यात नमूद विवरण नुसार पोंभुर्णा तालुक्यातील वेळवा चेक ला 10177 ब्रास, , जुनगांव ला 4417 ब्रास, आष्टा ला 2650 ब्रास तर थेरगाव रेती घाटातून 2208 ब्रास रेती ची उपलब्धता ठेवण्याची मंजुरी आपल्या विभागाकडून देण्यात आली आहें, पण आपण यांना जी रेती स्टॉक ची परवानगी दिली आहें तो आपण स्टॉक बघितला तर आपल्या मंजुरीच्या किमान 10 तें 20 टक्के जास्तीचा स्टॉक आहें व आतापर्यन्त मंजूर रेती स्टॉक पेक्षा कित्तेक पट रेती अगोदरचं विकल्या गेली आहें, यामुळे शासनाचा कोट्यावधी महसूल बुडविल्या जात आहें, याला स्थानिक तहसीलदार मंडळ अधिकारी व तलाठी जबाबदार असून त्यांचेवr कारवाई करण्याची गरज आहें.

पोंभुर्णा तालुक्यात जी परिस्थिती आहें तीच मूल तालुक्याची असून या तालुक्यात असलेल्या राजोली 3710 ब्रास, डोंगरगाव 2120 ब्रास, कोसंबी 15590 ब्रास, चकनळेश्वर 2120 ब्रास, मूल आकापूर 3180 ब्रास तर नाळेश्वर मोकसा 1988 ब्रास रेती ची उपलब्धता करण्याची परवानगी दिली असतांना आता तिथे मोठ्या प्रमाणात रेतीचे ढिगारे दिसत असून कित्तेक पटीने रेतीचा स्टॉक आहें आणि तेवढीच रेती विकल्या सुद्धा गेली आहें म्हणजे आपण मंजूर केलेल्या रेती स्टॉक च्या किमान 20 पट रेती उपलब्ध झाली आहें व त्यातून अर्ध्यापेक्षा जास्त रेती विकल्या गेली आहें, त्यामुळे एकूण 47 रेती घाटातून जी 27,84,54,600/- रुपयाची उपलब्ध रेती विकण्याचे उद्दिष्ट होते त्यापेक्षा 20 पट म्हणजे जवळपास 550 कोटीची रेती विकली जाणारं आहें आणि यातून शासनाचा 400 कोटींपेक्षा जास्त महसूल बुडविल्या जात आहें, यामध्ये आपण ठरवलेले हे रेट 600/- रुपये प्रती ब्रास ठरवले असले तरी बाजारात याची किंमत प्रति ब्रास 5000/- प्रती सुरु असल्याने हा व्यवसायातून रेती घाट धारक किमान 8 तें 9 पटीने जास्तीची किंमत ठेऊन रेती विकत आहें म्हणजे ही किंमत 3 हजार कोटी पेक्षा जास्तीची जात असल्याने या माध्यमातून स्थानिक तहसीलदार पोलीस प्रशासन यासंह महसूल विभागाचे सर्व अधिकारी यांना पैसे देऊन हा रेतीचा हजारो कोटींचा व्यवसाय सुरु केला आहे व कोट्यावधी रुपायाचा शासनाचा महसूल बुडविल्या जात असल्याने रेती घाट धारकांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मनसे वाहतूक सेनेचे महेश वासलवार यांनी दिला आहे

