Eight-hour encounter between police and Maoists in Gadchiroli - 4 Maoists killed

गडचिरोली :गडचिरोली नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात सोमवारी गडचिरोलीत पोलिस- माओवादी त आठ तास चकमक झाली असून यात ४ जहाल माओवादी (१ पुरुष व ३ महिला) ठार झाले असून, घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. Eight-hour encounter between police and Maoists in Gadchiroli – 4 Maoists killed
दिनांक २५ ऑगस्ट रोजी गडचिरोली विभागातील गट्टा दलम, कंपनी क्रमांक १० व इतर माओवादी दबा धरून बसल्याची विश्वासार्ह माहिती मिळाल्यानंतर
अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश यांना दिनांक २५ ऑगस्ट रोजी गडचिरोली विभागातील गट्टा दलम, कंपनी क्रमांक १० व इतर माओवादी दबा धरून बसल्याची विश्वासार्ह माहिती मिळाली तेव्हा C-60 ची १९ व CRPF QAT ची २ पथकांद्वारा भर पावसादरम्यान दोन दिवस शोधमोहिम सुरू असता सोमवारी सकाळी पोलिस पथके परिसरात दाखल होताच माओवादींनी अचानक अंदाधुंद गोळीबार सुरू केला. #NewsJagar

जवळपास आठ तास चाललेल्या चकमकीनंतर शोध घेतला असता १ पुरुष व ३ महिला अशा चार माओवादींचे मृतदेह पोलिसांना मिळून आले. तसेच घटनास्थळावरून बऱ्याच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
सदर परिसरात माओवादविरोधी मोहीम सुरू असून उर्वरित माओवादींचा शोध पोलिसांकडून केला जात आहे .
#गडचिरोली #gadchiroli

