rules-for-dog-by-Nagpur-police

नागपूर
कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, नागरिकांकडून रस्त्यावर आणि महानगरपालिकेच्या बागेत पाळीव प्राण्यांना अनियंत्रित सोडल्याच्या तक्रारी येत आहेत. शहरातील पाळीव कुत्र्यांबाबत मालकांसाठी नागपूर पोलिसांनी नियम जारी केलेले असून कुत्र्यांना पट्टा किंवा थूथनशिवाय फिरू देऊ नये असे सांगण्यात आले आहे. तसेच पाळीव प्राण्यांच्या मालकांनी त्यांच्या कुत्र्यांच्या कॉलरवर त्यांची नावे आणि पत्ते जोडावेत. योग्य ओळख नसलेले कुत्रे भटके मानले जातील आणि त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. News Jagar
पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल CP. Dr. Ravindra Singal यांनी पाळीव प्राण्यांना फिरताना थूथन किंवा जाळी घालणे आवश्यक असले तरी, कुत्रे सहजपणे श्वास घेऊ शकतील अशा पद्धतीने ते बसवीले पाहिजे. आणि सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला घालण्यास मनाई केल्या गेली आहे . त्यासाठी नागरिकांनी नागपूर महानगरपालिकेने (एनएमसी) मंजूर केलेल्या नियुक्त फीडिंग झोनमध्येच भटक्या कुत्र्यांना खायला घालावे असे त्यांनी आहे सुचविले आहे. Ruls issued by Nagpur Police For Dog Owners .


