
गोवंश तस्करीवर सावली पोलिसांची धडक कारवाई
न्युज जागर :-योगेश रामटेके
सावली, ११ ऑगस्ट
गोवंश तस्करीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत १३ नग गोवंशांची सुटका केली असून, पिकअप वाहनासह एकूण ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी वाहन चालकाला अटक करण्यात आली असून, एक आरोपी फरार आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोवंशांची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून पिकअप वाहनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनामध्ये १३ नग गोवंश कोंबून नेले जात असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करून जनावरांची सुटका केली. तर या कारवाईत १ लाख ३० हजार रुपये किमतीचे १३ गोवंश तसेच ३
वस्तू वाहक
अटकेतील आरोपीसह पोलिस
लाख रुपये किंमतीचे पिकअप वाहन असा एकूण ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी चालक फारूख
- शेख महरूफ शेख याला अटक करण्यात आली आहे. तर वसीम शेख हा आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

