
गडचिरोली, दि. ३ ऑगस्ट : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टी, गडचिरोली शहर यांच्या मासिक बैठकीचे आयोजन आज (सोमवार, ३ ऑगस्ट) दुपारी ३.०० वाजता करण्यात आले आहे.
ही बैठक मा. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कार्यकर्ता कक्ष क्रमांक १, गडचिरोली येथे पार पडणार असून संघटनात्मक बळकटी, आगामी कार्यक्रमांचे नियोजन, शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा प्रचार-प्रसार तसेच बूथस्तरावरील कामकाजाचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या बैठकीस भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहरातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, युवा मोर्चा, महिला मोर्चा, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख तसेच शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी, गडचिरोली शहर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात असून आगामी राजकीय व संघटनात्मक रणनीतीवरही यावेळी सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.

