
नितेश गट्टीवार|गडचिरोली
लोकप्रतिनिधी आणि जनतेतील नातं हे केवळ राजकारणापुरतं मर्यादित नसून ते विश्वास, आपुलकी आणि माणुसकीवर उभं असतं, याची प्रचिती आमदार डॉ. मिलिंद रामजी नरोटे यांच्या अलीकडील दौऱ्यात पाहायला मिळाली.
भेटीदरम्यान एका सामान्य महिलेने आपल्या नवजात बाळाला आमदार डॉ. नरोटे यांच्या हातात दिले. त्यांनीही अत्यंत प्रेमाने बाळाला हातात घेत आशीर्वाद दिला. हा भावनिक क्षण उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेला. हा केवळ एक छायाचित्राचा क्षण नसून जनतेप्रती असलेली त्यांची आत्मीयता, संवेदनशीलता आणि माणुसकीची भावना अधोरेखित करणारा प्रसंग ठरला.

साधी राहणी, स्वच्छ प्रतिमा आणि सर्वसामान्य नागरिकांशी जिव्हाळ्याचे नाते या गुणांमुळे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी अल्पावधीतच जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रत्येक कुटुंबाच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची त्यांची कार्यपद्धती नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरत आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे, लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी तत्पर राहणारे आणि सेवेलाच आपले कर्तव्य मानणारे नेतृत्व म्हणून डॉ. मिलिंद नरोटे यांच्याकडे पाहिले जात आहे.
“पदाने नव्हे, तर प्रेमाने आणि सेवाभावाने माणसांची मने जिंकणारे नेतृत्व म्हणजे आमदार डॉ. मिलिंद रामजी नरोटे,” अशी भावना अनेक नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.

