
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली, दि. १ ऑगस्ट : स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने ‘गडचिरोली जिल्हा जनसेवा सप्ताहांतर्गत समाजरत्नांचा भव्य सत्कार सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे.
हा भव्य कार्यक्रम दि. ४ ऑगस्ट २०२६ (मंगळवार) रोजी सकाळी ९.०० वाजता गोंडवाना सैनिक विद्यालय, वाकडी येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमात समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार असून, स्व.अजितदादा पवार महिला सक्षमीकरण पुरस्कार, कृषीरत्न पुरस्कार, क्रीडारत्न पुरस्कार, अल्पसंख्याक समाजरत्न पुरस्कार तसेच विद्यार्थीरत्न पुरस्कार अशा विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभाऊ वासेकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून, जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कृषी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
हा सोहळा समाजातील उल्लेखनीय कार्यकर्त्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणारा ठरणार असल्याने जिल्हाभरात या कार्यक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

