
चामोर्शी,दि.३० जूलै:
गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून चामोर्शी–आष्टी मार्गावरील सोनापूर पुलावरून पाणी वाहत आहे. या दरम्यान पुलावरून तीन दुचाकी आणि एक सायकल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनास्थळी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी झाली असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.दरम्यान, नागरिकांनी पुराच्या पाण्यातून वाहन घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नये, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.


