
प्रतिनिधी / राजेंद्र मर्दाने
वरोरा : भारताचे माजी राष्ट्रपती, प्रख्यात शास्त्रज्ञ आणि ‘मिसाईल मॅन’ म्हणून जगभर ओळखले जाणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (दि. २७ जुलै) वरोरा येथील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम चौकात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
डॉ. कलाम यांनी विज्ञान, संशोधन, शिक्षण आणि युवकांना दिलेली प्रेरणा देशाच्या विकासासाठी आजही दिशादर्शक असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. राष्ट्रप्रेम, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि मोठी स्वप्ने पाहून ती साकार करण्याचा संदेश देणारे त्यांचे विचार नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.

या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन माजी सभापती तथा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाऊंडेशनचे अध्यक्ष शेख जैरुद्दीन (छोटूभाई) यांनी केले होते.
यावेळी चंद्रपूर जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष वसंत विधाते, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक गजानन मेश्राम, माजी नगर परिषद उपाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अनिल झोटिंग, नगरसेवक प्रवीण चिमुरकर, संतोष पवार, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक राजेंद्र मर्दाने, श्याम लेडे, दीपक भोयर, वसंतराव बरडे, माजी सैनिक गुलाबराव जिवतोडे, शेख मकसूद, मनोहर पारोधे, दशरथ शेंडे, संजय दानव, पत्रकार आशिष घुमे, प्रवीण खिरटकर, पाल सर, बाबाराव नांदेकर, पारोधे सर, गुलाब धोबे, मोहसीन पठाण, प्रशांत पिपरे, सतीश परचाके तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाला विनम्र अभिवादन करत, त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला.

