
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली | दि. २७ जुलै: ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी पाथरी येथील विश्रामगृहात सदिच्छा भेट देत पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. नेते यांनी प्रा. देशकर यांना उत्तम आरोग्य, निरोगी व दीर्घायुष्य लाभावे तसेच समाजहित, जनसेवा आणि राष्ट्रसेवेतील त्यांचे योगदान अधिकाधिक वृद्धिंगत व्हावे, अशी शुभेच्छा व्यक्त केली. त्यांच्या राजकीय व सामाजिक अनुभवाचा लाभ जनतेला भविष्यातही मिळत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्नेहपूर्ण वातावरणात झालेल्या या भेटीदरम्यान आसोलामेंढा तलाव व शेतीसाठी सिंचन पाणी उपलब्ध करून देण्याच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सिंचनाचे पाणी पोहोचविण्यासाठी आवश्यक त्या सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू असून, आसोलामेंढा तलावाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे डॉ. अशोक नेते यांनी सांगितले.
याशिवाय परिसरातील विकासकामे, संघटनात्मक बळकटी, जनहिताचे विविध विषय आणि ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांबाबतही उपस्थित मान्यवरांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष तनय देशकर, तालुका महामंत्री सचिन तंगडपलीवार, माजी उपसभापती तुकाराम पाटील ठिकरे, रवींद्र बोललीवार, जिल्हा महामंत्री नीलमताई सुरमवार, दिलीप ठिकरे, महिला मोर्चा तालुका अध्यक्षा छायाताई चकबंडलवार, ओबीसी नेते कवींद्र रोहनकर, शरद सोनवाने, दिलीप जाधव, नामदेवराव भोयर, राकेश विरमलवार, मोतीराम चिमुरकर, डॉ. गोबाडे, धीरज रोहनकर, मनोज अम्रोजवार, श्रीधर ठिकरे, सुदर्शन चामर्लावार यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

