
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली दि. २७ : छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवाभाव दिन’ विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मौशीखांब–मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील तब्बल १८ जिल्हा परिषद शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून पालक व शिक्षकांनी या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
या उपक्रमांतर्गत आंबेशिवणी, आंबेशिवणी टोली, आंबेटोला, भिकारमोशी, अमीर्झा टोली, अमीर्झा, कळमटोला, टेंभा, चंभर्डा, मरेगाव, मौशीखांब, बेलगाव, मोहटोला, राणखेडा, मुरमाडी, मौशीचक, बोथेडा आणि गिलगाव येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिलसह विविध शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले, “शिक्षण हेच जीवनातील अंधार दूर करून ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करणारे प्रभावी साधन आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने दर्जेदार शिक्षण घेऊन आत्मविश्वासाने पुढे जावे. प्राथमिक शिक्षण मजबूत असेल तरच उज्ज्वल भविष्याची भक्कम पायाभरणी होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच कौशल्य विकासालाही तितकेच महत्त्व आहे.”
ते पुढे म्हणाले की, आजच्या आधुनिक युगात शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या असून प्रत्येक विद्यार्थ्याने त्याचा लाभ घ्यावा. जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रत्येक शाळेत आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय शिक्षण घेता यावे, यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाला छत्रपती सेनेचे जिल्हाप्रमुख यादवजी लोहंबरे, उपजिल्हाप्रमुख गोपाल मोंगरकर, जिल्हासंघटक विनोद चापले, तालुकाप्रमुख प्रकाश भजभुजे, जिल्हा समन्वयक यादव चौधरी, दीपक लाडे, प्रशांत ठाकूर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी शाम झोडे, मोतीराम भुरसे, जगण चापले, बळीराम गेडाम, तानबा दजगाये, शुभम कुकडकर, भूषण लोहंबरे, भीमराव ठाकरे, चांगदेव कोहपरे, गणेश वाघमारे, पितांबर नैताम, राहुल ठाकरे, प्रवीण म्हस्के, विजय मत्ते, बालाजी चापले, निखिल कुढवे, विकास ठाकरे, साहिल कोहपरे, चैतन्य मेश्राम, लक्ष्मण चौधरी, राजेंद्र ढवळे, दुर्योधन भैसारे, महेश खेडेकर, चंद्रशेखर पेंदाम, सुनील कोसमशिले, मनोहर कोसमशिले, दीपक कोसमशिले, प्रशांत मडावी तसेच इतर छत्रपती सैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात आलेल्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे.

