
गडचिरोली,दि.२१ जूलै :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली जिल्ह्यात २२ ते २८ जुलै २०२६ दरम्यान ‘जनसेवा सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार हा उपक्रम राबविला जात आहे.
सप्ताहनिमित्त नियोजित विविध उपक्रम:

२२ जुलै (सुरुवात): पर्यावरण संवर्धन उपक्रमांतर्गत ‘हरित महाराष्ट्र’, ‘वृक्ष माझी सावली’, ‘दादांची सृष्टी’ व ‘हरित सृष्टी’ या थीम अंतर्गत शाळा, महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणी १००१ वृक्ष लावले जातील.
२३ जुलै: प्रत्येक तालुका व शहरात आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाईल.
२४ जुलै: महापुरुषांची स्मारके आणि एस.टी. स्टँडची स्वच्छता केली जाईल. तसेच, महिला आघाडीच्या वतीने कर्तृत्ववान महिलांना ‘अजितदादा महिला सक्षमीकरण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येईल.
२५ जुलै: प्रगतशील शेतकरी महिला व पुरुषांना ‘मा. अजितदादा कृषी सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात येईल.
२६ जुलै: उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा ‘मा. अजितदादा क्रीडा रत्न पुरस्कार’ देऊन सत्कार केला जाईल.
२७ जुलै: अल्पसंख्याक समाजात कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘अल्पसंख्याक समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल.
२८ जुलै (समारोप): महिला व बाल रुग्णालयात किमान १०१ रुग्णांना फळवाटप करून सप्ताहाचा समारोप केला जाईल.
ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी दिली आहे.

