
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार समाजहिताचे विविध उपक्रम; गडचिरोलीत महिला व बाल रुग्णालयात फळे वाटप, ‘एक घास माणुसकीचा’ उपक्रम, वृद्धाश्रमात अन्नदान व वृक्षारोपण
जिल्हा प्रतिनिधी |नितेश गट्टीवार
गडचिरोली, दि. २१ जुलै :महाराष्ट्राचे लोकप्रिय, विकासाभिमुख मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या २२ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात विविध सेवाभावी व समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असे आवाहन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी केले आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा देण्यापेक्षा समाजहित जपणारे, गरजूंच्या सेवेसाठी समर्पित आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देणारे उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातही विविध सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. अशोकजी नेते यांनी सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, आघाडी व मोर्चाचे अध्यक्ष, कार्यकर्ते आणि नागरिकांना आपल्या-आपल्या परिसरात पुढील उपक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे.
– रक्तदान शिबिरांचे आयोजन.
– शासकीय रुग्णालयात रुग्णांची विचारपूस करून फळे वाटप व सेवा.
– ‘एक घास माणुसकीचा’ उपक्रमांतर्गत गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान.
– वृद्धाश्रमांना भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांशी संवाद, अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.
– वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश.
– विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.
गडचिरोली येथे विशेष सेवाभावी कार्यक्रम
माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या पुढाकाराने २२ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून गडचिरोली शहरात पुढील कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
वेळ| ठिकाण| उपक्रम
सकाळी १०:३० वा.| महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली| रुग्णांना फळे वाटप..
सकाळी ११:०० वा.| महिला व बाल रुग्णालय| ‘एक घास माणुसकीचा’ उपक्रमांतर्गत रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान
त्यानंतर| मातोश्री वृद्धाश्रम, गडचिरोली| ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण व अन्नधान्य कीटचे वाटप
अन्नदान कीटमध्ये तांदूळ, डाळ, खाद्यतेल, मीठ, तिखट यांसारख्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.
डॉ. अशोकजी नेते यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना आपल्या गावात, शहरात आणि परिसरात अशाच सेवाभावी, लोकहितवादी आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करून मुख्यमंत्री यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचे आवाहन केले आहे.
“वाढदिवस साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे समाजसेवा. गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे हीच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या चेहऱ्यावरचा आनंदोत्सव ठरेल,” असे डॉ. अशोक नेते यांनी म्हटले.

