
अमरावती – अमरावती शहरातील राजकमल व जयस्तंभ चौकातून रेल्वे स्टेशन आणि हमालपुऱ्याकडे उतरणारा रेल्वे उड्डाणपूल आज सोमवार, २५ ऑगस्टपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
रेल्वे उड्डाणपुलाची अवस्था अत्यंत जर्जर झाली असल्याने त्यावरील जड वाहनांची वाहतूक २४ जुलैपासून अचानक बंद केली होती. केवळ दुचाकी, ऑटो आणि कार अशा तीनच प्रकारच्या वाहनांसाठी हा मार्ग खुला होता. मात्र, आता सर्वच प्रकारच्या वाहनांसाठी हा मार्ग बंद करण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सांगितले.
या संबंधीची तातडीची अधिसूचना वाहतूक विभागातर्फे जारी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी रेल्वे, बांधकाम आणि पोलिस विभागातील अंतर्गत पत्रव्यवहारही पूर्ण झाला आहे.
दरम्यान, वाहतूक बंदीच्या अंमलबजावणीसाठी पुलाच्या चारही बाजूने बॅरिकेडस् लावण्यात आले. तसेच अधिसूचनेचे उल्लंघन करू नये म्हणून तेथे पोलिसांचा खडा पहाराही तैनात करण्यात येणार आहे. हा पूल १९८३ मध्ये उभारला आहे. त्या पुलाचे आयुष्यमान संपुष्टात आल्याचा अहवालही यापूर्वीच देण्यात आला असून, त्याठिकाणी नवा पूल बांधण्याचे रेल्वे विभागाने सूचवले आहे. परंतु तरीही या विषयाकडे चालढकल केली जात होती. दरम्यान, सोमवारपासून या पुलावरील सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद करण्यात आला असल्याचा निर्णय घेण्यात आला.

या पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार उड्डाणपुलाच्या स्टील गडर्सला जंग लागलेला आहे. तसेच डेक स्लॅबमध्ये अनेक ठिकाणी फ्लेक्सरल आणि शीअर क्रॅकिंग आढळले असून, गळतीही लागली आहे. स्टील गर्डर्सना आधार देणाऱ्या अॅब्टमेंटमध्ये गळती यासारख्या गंभीर उणिवाही दिसून आल्या आहेत. त्यामुळे वाहतूक बंदी केली आहे
हे राहणार पर्यायी मार्ग
वाहतूक बंदी नंतर पायी मार्गाची करण्यात येणार आहे. एसटी व शहर यादीही सदर अधिसूचनेत समाविष्ट बससह इतर जड वाहनांसाठी वाहने हमालपुऱ्याकडून येणारी बसस्टैंड मार्गे रेल्वे स्टेशन चौक-मच्र्क्युरी टी पॉइंट मार्गे पुढे जातील. तर बस स्थानकातून निघणाऱ्या एसटी व शहर बसेसही याच मार्गाचा वापर करतील.
दरम्यान, राजकमल व जयस्तंभ चौकाकडून येणारी वाहने उड्डाण पुलाऐवजी मालवियचौकातून पुढे रवाना होतील. इतर वाहनधारकांनाही याच पर्यायी मार्गांचा वापर करण्यात येणार आहे.

