
वनविभागाने सोडला सुटकेचा स्वास,!शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण
योगेश रामटेके :न्युज जागर
सावली (चंद्रपूर): महिनाभरारापासून चंद्रपूर जिल्यातील सावली तालुक्यात प्रवेश
केलेल्या हत्तींच्या कळपाने अखेर वैनगंगा नदी ओलांडून गडचिरोली जिल्ह्यात परत जाण्याचा मार्ग धरला आहे. बुधवारी रात्री ४.३० वाजताच्या सुमारास हत्तीचा कळप गडचिरोलीच्या हद्दीत दाखल झाल्याने, गेले महिनाभर रात्रंदिवस पहारा देणाऱ्या सावली वनविभागाने अखेर सुटकेचा श्वास घेतला आहे.

महिनाभरापूर्वी हत्तींच्या या कळपाने सावली वनपरिक्षेत्रात प्रवेश केल्याने वनविभागाची चांगलीच तारांबळ उडाली होती. हत्तींमुळे मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण होऊ नये, यासाठी वनविभागाने तातडीने पावले उचलली होती. गावागावांमध्ये दवंडी देऊन आणि बॅनर लावून जनजागृती करण्यात आली. हत्तींचा हा कळप सतत आपली जागा बदलत असल्याने वनविभागाचे कर्मचारी आणि पीआरटी सदस्य रात्री-अपरात्री हत्तींच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून
सध्या शेतीचा हंगाम सुरू असून शेतकऱ्यांनी आवत्या व पडे टाकलेली ( आहे, अशातच या हत्तींच्या कळपाने उमरी, हरंवा, गवारला, रयतवारी आणि उपरी येथील घनदाट जंगलात व शेतशिवारात तब्बल १५ ते २० दिवस मुक्काम ठोकला होता. तिथे खाण्यासाठी पुरेसा चारा आणि राहण्यासाठी अनुकूल जागा मिळाल्याने हत्ती तेथून हलत नव्हते.
शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ५० ते ६० जणांच्या वनविभागाच्या पथकाने हातात मशाली (टेंबे), टॉर्च आणि ड्रोन कॅमेऱ्यांच्या साहाय्याने रात्रंदिवस मोहीम
वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोडला सुटकेचा निःश्वास
राचविली. अखेर, बुधवारी रात्री हत्तींच्या कळपाने उमरी तलाव परिसर सोडला
आणि वैनगंगा नदीपात्रातून गडचिरोली जिल्ह्यात ‘यू-टर्न’ घेतला. हत्ती तालुक्याबाहेर गेल्याने वनविभागाची आणि गावकऱ्यांची चिंता आता दूर झाली आहे. हत्तींच्या या महिनाभराच्या
मुक्कामामुळे आणि परतीच्या प्रवासामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वनविभागाने या शेतशिवारांचे तातडीने पंचनामे करून योग्य ती आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील बाधित शेतकऱ्यांनी केली आहे.
हत्तींच्या कळपामुळे ज्या शेतक-यांच्याशेतातील पिकांचे नुकसान झाले आहे, त्याचे तातडीने पंचनामे केले जातील. शेतकऱ्यांनी काळजी करू नये, शासन निर्णयानुसार त्यांना योग्य ती नुकसान भरपाई नक्कीच दिली जाईल.
– मारोती पुल्लेवार उपवनपरिक्षेत्रअधिकारी,
व्याहाङ खुर्द


