
प्रतिनिधी
गडचिरोली,दि.२ जुलै : बनावट प्रशासकीय मान्यता आदेश बनवून सर्वांची दिशाभूल आणि फसवणूक केल्याचा ठपका असलेल्या चामोर्शीच्या नगरसेवक आशिष पिपरे याची महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आली.
राज्य अध्यक्ष रामदास तडस यांनी तसे पत्र देत आशिष पिपरे यांना या जबाबदारीतून मुक्त केले. त्यांच्या जागी जिल्हाध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा माजी नगरसेवक तथा भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रमोद पिपरे यांची नियुक्ती करण्यात आली.

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष म्हणून आशिष अरुण पिपरे यांची अलिकडेच म्हणजे 26 जानेवारी 2026 रोजी नियुक्ती करण्यात आली होती. पण प्रमा प्रकरणात गुन्हा दाखल होऊन अटक झाल्यानंतर समाजात संभ्रम निर्माण झाल्याचे सांगत त्यांना जिल्हाध्यक्षपदावरून हटविण्यात आले.
दरम्यान प्रमोद पिपरे यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देताना लवकरात लवकर गडचिरोली जिल्ह्याचा मेळावा घेऊन नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ घेण्याची सूचना त्यांना राज्य अध्यक्ष रामदास तडस यांनी केली आहे

