
पुन्हा तीव्र जलसमाधी आंदोलन
बुलढाणा – अलीकडेच बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प स्थळी जलसमाधी आंदोलनादरम्यान एका आंदोलकाने जलसमाधी घेतली होती. हा मुद्दा ताजा असतानाच आता जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील उतावळी प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक झाले आहे.
गेल्या पंचवीस वर्षापासून प्रकल्प पूर्ण झाला. मात्र अद्यापही मोबदला मिळाला नसल्याने वाढीव मोबदला देण्याच्या मागणीसाठी हे प्रकल्पग्रस्त येत्या 2 सप्टेंबर रोजी उतावळी प्रकल्पात कुटुंबीयांसह जलसमाधी आंदोलन करणार आहेत. जिगावनंतर आता उतावळी प्रकल्पग्रस्त जलसमाधी तीव्र आंदोलन करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उतावळी प्रकल्पाला 1998 साली मंजुरात मिळाली आणि 2004 साली हा मोठा प्रकल्प पूर्ण झाला. मात्र, अद्यापही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला किंवा वाढीव मोबदला मिळाला नसल्याने हे शेतकरी आता आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनीआताआक्रमकपवित्राघेतथेट जलसमाधी आंदोलनाचाइशारादिलाआहे.

