
गुरुदेव स्पोर्टींग क्लब, कृष्णनगर च्या वतीने ग्रामीण स्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन
चामोर्शी : चामोर्शी शहराला लागून असलेल्या कृष्ण नगर यावर्षी सुद्धा गुरुदेव स्पोर्टींग क्लब, कृष्णनगर च्या वतीने ग्रामीण स्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी उदघाट्न सोहळ्याप्रसंगी विशेष उपस्थिती दर्शविली.
यावेळी भाजप जिल्हा सचिव दिलीप चलाख, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, साईनाथ बुरांडे, रतन सरकार, लोमेश सातपुते, रजनीकांत बाला, सुमंत दास, विपुल बाडई, सुजित मिस्त्री, सुशेन रॉय, प्रियोतोष मंडल, नितीश बैरागी, सुबीर मसीद तसेच आयोजक मंडळाचे सदस्य सहभागी संघांचे खेळाळू उपस्थित होते.


