
फुटबॉल स्पर्धेतील विजेता व उपविजेता संघाला भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते बक्षीस वितरण
चामोर्शी – 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथे नेताजी सुभाषचंद्र बोस सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय फुटबाल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 24 ऑगस्ट रोजी स्पर्धेचा शेवटचा अंतिम सामना पार पडला या सामन्याला भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी उपस्थीती दर्शविली व त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा पार पडला. विजेता संघ ग्रीन सिटी क्लब, नागपुर व उपविजेता संघ के.जी.एन. सिटी क्लब, नागपुर त्यांच्या हस्ते विजेता, उपविजेता संघाला अंतिम सामन्याचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी खेळाडूंची भेट घेत स्पर्धेत उस्फुर्त सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानत सहभागी संघातील खेळाळू यांना चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांना राज्यस्तरावर सहभागी होऊन चांगले खेळ खेळावे तसेच त्यांना शुभेच्छा देऊन खेळाडू चे मनोबल उंचावले. व फूटबॉल स्पर्धेच्या आयोजकांनी उत्कृष्ट रित्या नियोजन केल्याबद्दल मंडळातील सदस्यांचे कौतुक केले.
यावेळी प्रामुख्याने श्री. बबलुभाई हकीम (वन वैभव शिक्षण समिती,श्री. राकेशभाऊ बेलसरे,शिवसेना जिल्हा प्रमुख, भाजप जिल्हा सचिव दिलीप चलाख, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा,श्री. गौरव भाऊ बाला शिवसेना तालुका प्रमुख, श्री. कृष्ण मंडळ सरपंच ग्रामपंचायत, सुभाषग्राम, श्री बीधानंचद्र बेपारी प्राचार्य, मा.श्री. सतिश नरेन रॉय निरंजन बाच्छाड, संतोष रॉय, गिरीश सरकार, नितीश बाच्छाड, मिथुन बिश्वास, समीर रॉय, श्यामल रॉय, रेभा सरदार, गोपाल टिकेदार, आशिष बारई, प्रशांत मल्लिक, विकास मंडल, महानंद हलदार उपस्थित होते.


