
गडचिरोली शहरातील स्नेहनगर अत्यंत खराब नालीयुक्त विषारी युक्त नळाद्वारे दूषित विषारी पाण्याचा पुरवठा होत आहे अनेकदा तक्रारी देऊन सुद्धा नगरपरिषद याच्याकडे कानाडोळा करत आहे हेच पाणी गडचिरोली शहरातील नगर परिषद चे मुख्याधिकारी यांना पाजायचे का ? आम्ही पाणीपट्टी कर देतो आम्ही त्रास का बर यांचा सहन करायचा आणि किती दिवस करायचा गडचिरोली नगरपरिषद चा भोंगळ कारभार आजचा चव्हाट्यावर वर आलेला आहे गडचिरोली नगरपरिषद प्रशासन मस्त जनता सुस्त घरचे नगरपरिषद पालिकेतर्फे अनेक महिन्यापासून नाल्यांचा उपसा झालेला नाही वार्डांना झाडू लागलेला नाही स्नेहनगर मध्ये अनेक महिन्यापासून फवारणी झाली नाही झोपलेल्या नगरपरिषद ला जागा करण्यासाठी लवकरच मारबत मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते रुपेश वलके यांनी दिला आहे.

