
सोनू वाळके,जिल्हाप्रतिनिधी, गडचिरोली.
चामोर्शी :- गडचिरोली जिल्ह्यातील विदर्भाची काशी म्हणून ओळख असणारे चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देव येथे MSRDC (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) अंतर्गत येथे संडास,बाथरूम व नाली बांधकाम चे काम मोठ्या जोराने चालू असून भर ऐन पावसाळ्यात येथे मेन रोड च्या बाजूला नालीबांधकाम साठी मोठे मोठे खड्डे करून काम अर्धवट सोडले आहे,पावसाच्या पाण्याने हे खड्डे पूर्णपणे तुडुंब भरून असून अपघातास निमंत्रण देत आहे,तरी संबंधित कंत्राटदार व प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष्य आहे,या तुडुंब भरलेल्या खड्यामुळे रात्री च्या वेळी ये जा करण्यास जीव मुठीत ठेऊन जावं लागत आहे,स्थानिक नागरिक यांची वस्ती लागून असल्यामुळे लहान मुले खेळताना काही अपघात होणे नाकारता येत नाही,यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अंतर्गत जिल्ह्यातील बांधकामे कंत्राटदार ला देऊन उच्य दर्जाचे काम करावे हीच अपेक्षा नागरीकांची असते परंतु मारखंडा देव येथी संडास,बाथरूम च्या कामाची पाहणी केली असता फौंडेशन पासूनच काम हे निकृष्ट दर्जाचे दिसून आले,. अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने कंत्राटदार घाईघाईत काम करत असल्याचे दिसून येत आहे, यात कामाचा कोणताही दर्जा राखला जात नाही,गावातील काम हे चांगल्या दर्जाचे व्हावे अशी स्थानिक गावकर्यांची मागणी आहे.
तरी अशे अर्धवट खोदकाम केलेले नालीचे खड्डे यावर उपाययोजना करून नागरिकांचे जीव सुरक्षित करावे असे स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

संबंधित ठेकेदार शी संपर्क केला असता उत्तर देण्यास टाळाटाळ करताना दिसून येत आहे.

