
सोनू वाळके,जिल्हाप्रतिनिधी, गडचिरोली.
चामोर्शी :-
चामोर्शी तालुक्यातील विक्रमपूर येथे सरपंच व सचिव यांच्या संगमताने काम न करता लाखोंचा भ्रष्टाचार.
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात विक्रमपूर ग्रामपंचायत येथे 15 ऑगस्ट ला ग्रामसभा आयोजित केली असून कामाचा आढावा घेत असताना 15 व्या वित्त आयोगानुसार कामाचे बिल कागदोपत्री दाखवून ,काम न करता लाखोंची अफरातफर व भ्रष्टाचार करण्यात आला,असे ग्रामस्थांचे आरोप आहेत,त्यात सरपंच सरकार,सचिव बर्डे ,कर्मचारी मिडून हा भ्रष्टाचार करण्यात आला असा आरोप विक्रमपूर ग्रामस्थांनी केला आहे,
विक्रमपूर हा बंगाली असलेला समाज आहे,लाखोंचा निधी या गावाच्या कामासाठी मिडतो परंतु गावाचा विकास हा कित्येक वर्षपासून झाला नसून त्या निधीचा गैरवापर केला असून सरपंच आणि सचिव यांनी स्वार्थ साधून गावाचा विकास न करता स्वतःचा विकास केला यात सरपंच,सचिव व कर्मचारी संगमताने कामे केल्याचं आरोप आहे त्यात ब्लीचिंग खरेदी,सॅनिटरी पॅड,पाईप लाईन, झाडे तोडणे,मुरूम टाकणे,कौशल्य विकास प्रशिक्षण, कॉम्प्युटर training, सोलर highmast बसवणे,डस्ट बिन,वॉटर atm, मोबाईल द्वारे नळ, पाणीपुरवठा योजना,तसेच 26 जानेवारी सांस्कृतिक कार्यक्रम या सारख्या योजना दाखवून बिल कागदोपत्री दाखवून काम न करता लाखोंचा भ्रष्टाचार व अफरातफर केल्याचं आरोप विक्रमपूर ग्रामस्थांनी केला.
सरपंच व सचिवाकडून वसुली करून दंडात्मक गुन्हा नोंदविण्यात यावा अशी विक्रमपूर ग्रामस्थांची मागणी केली आहे.

NEWS JAGAR (आवाज सत्याचा)

