
जिल्हा प्रतिनिधी |गडचिरोली
चामोर्शी – गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, दि. १४ जुलै रोजी चामोर्शी येथे विद्यार्थ्यांना नोटबुकचे वाटप करण्यात आले.
हा उपक्रम यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, चामोर्शी येथे राबविण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमास काँग्रेसचे पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, माजी तालुकाध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद खोबे, ज्येष्ठ नेते रियाज शेख , चामोर्शी नगरसेवक सुमेध तुरे, काँग्रेस मीडिया तालुका अध्यक्ष विजय लाड, सुधीर गडपायले तसेच कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्याम रामटेके, राजू धोडरे, प्रा. प्रेमानंद वालदे, गुरुदेव सातपुते , निलेश शिरसागर , प्रदीप भांडेकर , प्रवीण गव्हारे सर तसेच अन्य शिक्षकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य केले.
तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेचे मुख्याध्यापक धनराज पोरटे , शिक्षिका श्रीमती वर्षा मानापुरे, वर्षा धाईत, तुषार चांदेकर , प्रवीण पोटवार , जीवनदास सिडाम सर, दिलीप दूधबावरे सर, शिक्षिका वंदना रामटेके, राजश्री रामगीरवार, सिताराम भोयर सर आदी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगणबोडी हेटी येथेही विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण करण्यात आले.यावेळी मारोती बारसागडे, मुख्याध्यापक बंडावार, शिक्षक देवकत्ते व कर्मचारी उपस्थित होते.
खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

