
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली,दि.८ जूलै:
अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या देणगीतील कथित अपहार प्रकरणाच्या निषेधार्थ गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवार, दि. ९ जुलै २०२६ रोजी सत्याग्रह आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे आंदोलन सकाळी ११.०० वाजता श्रीराम मंदिर, फुटका मंदिराजवळ, कारगील चौक, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे होणार आहे. श्रीराम भक्तांच्या श्रद्धेशी संबंधित या गंभीर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आयोजकांनी केली आहे.
आंदोलनात काँग्रेस पक्षाचे सर्व तालुकाध्यक्ष, आजी-माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, NSUI, सेवादलचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॶॅड.विश्वजीत मारोतराव कोवासे केले आहे.
आयोजकांच्या म्हणण्यानुसार, श्रीराम भक्तांच्या श्रद्धेशी संबंधित कोणत्याही प्रकारचा कथित भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही आणि या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी हे सत्याग्रह आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

