
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा, ग्रारापत्ती येथे ३० जून २०२६ रोजी शाळेचा ‘पहिला दिवस महोत्सव’ व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. अतिदुर्गम व नक्षलप्रभावित भागात अशा प्रकारचा नियोजनबद्ध उपक्रम प्रथमच राबविण्यात आल्याने कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे वातावरण लाभले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. रघुनाथजी आचला यांच्या हस्ते करण्यात आले, तर अध्यक्षस्थानी मा. ब्रिजलालजी आचला होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. मुकेशदादा नरोटे (सचिव, आ. आघाडी भाजप गडचिरोली), मा. क्रांतिदादा केरामी (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, कोरची) तसेच मा. राजेशजी नैताम (अध्यक्ष, जंगलकामगार संघटना गडचिरोली) उपस्थित होते.

प्रमुख अतिथी म्हणून मा. जकताप सर (शिक्षण अधिकारी, वर्धा), डॉ. कीर्ती धनकर मॅडम (वैद्यकीय अधिकारी, ग्रारापत्ती) तसेच मा. विनोद मडावी सर (मुख्याध्यापक) यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारीवर्ग तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड व रुची निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक व शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
अतिदुर्गम भागात अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात आल्याने पालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

