
गडचिरोली/चामोर्शी,दि.१९जून :
चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील कुणघाडा फाट्याजवळ ट्रक आणि दुचाकीची जोरदार धडक होऊन एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचे मोठे नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सदर प्रतिनिधीने पोलिस विभागाशी सदर अपघाताबद्दल विचारणा केली असता मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे तसेच अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

