
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
देसाईगंज दि.१८ जून:
देसाईगंज शहरातील भीषण पाणीटंचाई व नागरिकांना भेडसावणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येच्या निषेधार्थ तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज यांच्या वतीने आज दि.१९ जून सायंकाळी ४ वा.नगर परिषदेवर मडका फोडो आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

देसाईगंजकरांच्या न्याय हक्कासाठी या आंदोलनात मोठ्या संख्येने शहरातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शहर व तालुका काँग्रेस कमिटी, देसाईगंज यांच्या वतीने करण्यात आले आहे.

