
नितेश गट्टीवार गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
चामोर्शी,दि.१८ जून:
भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कार्यालयचा भोंगळ कारभारआणि ढिसाळ सेवा यांमुळे ग्राहक कमालीची नाराजीचा सूर लावत आहेत. त्यांच्या ढिसाळंसेवामुळे अनेकदा ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे . स्लो नेटवर्कमुळे ग्राहकांना नाहक त्रास त्यामुळे कामकाज, शिक्षण, व्यावसायिकांना तसेच सर्वच क्षेत्रात अडथळा निर्माण होत आहे.

मुख्य समस्यांमध्ये नेटवर्क खंडीत होणे, खराब ग्राहक सेवा (Customer Service), तांत्रिक बिघाड, आणि नवीन कनेक्शन्स मिळण्यात होणारा प्रचंड विलंब Bsnl कडून ग्राहकांची आर्थिक लूट केल्या जाते, तक्रारीची वेळेवर दखल घेतली जात नसल्याचे ग्राहकांच्या तक्रारीचा समावेश आहे.
ढिसाळ ग्राहक सेवा:-
नेटवर्क किंवा इंटरनेट बंद पडल्यास तक्रार नोंदवूनही कर्मचाऱ्यांकडून वेळेवर मदत मिळत नाही. ग्राहकांच्या समस्येचे त्वरित निवारण होत नाही.वारंवार खंडित होणारे नेटवर्क: ग्रामीण आणि निमशहरी भागात बीएसएनएलचे ब्रॉडबँड आणि मोबाईल नेटवर्क वारंवार डाऊन होते. अनेकदा केबल तुटल्यास ती दुरुस्त करण्यासाठी अनेक दिवस लागतात अशा ग्राहकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढतच आहेत.
आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव:- खाजगी कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचे 4G आणि 5G जाळे देशभरात पोहोचण्यात मोठा उशीर झाल्याने , तसेच ढिसाळ सेवेमुळे ज्यामुळे ग्राहकांनी इतर कंपन्यांकडे स्थलांतर केल्याचे चित्र आहे.
व्यवस्थापनाचा अभाव: व्यवस्थापकीय त्रुटी आणि धोरणात्मक अडचणींमुळे या सरकारी कंपनीला आर्थिक फटका बसला असून, याचा थेट परिणाम ग्राहकांना मिळणाऱ्या सेवांवर होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
संबधित विभागाच्या कार्यप्रणालीवर ग्राहकांकडून थेट आरोप केल्या जात आहे.

