
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली:
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आले आहेत.
डॉक्टर श्रीकांत बनसोड यांची सहसंपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असून गडचिरोली जिल्हा त्यांचे कार्यक्षेत्र असेल.

पवन गेडाम आणि दिलीप सुरपाम यांची जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पवन गेडाम यांच्याकडे गडचिरोली व आरमोरी विधानसभा तर दिलीप सुरपाम यांचे कार्यक्षेत्र अहेरी विधानसभा असेल शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून माहिती देण्यात आली आहे.

