
अरुण बारसागडे , उपसंपादक, न्यूज जागर चंद्रपूर
नागरिक भयभीत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना हत्ती गो बँक म्हणण्याची वेळ.
मागील हप्ता भरापासून वनपरिक्षेत्र सावली येथे गडचिरोली जिल्ह्यातून आलेल्या टस्कर हत्ती च्या कळपाने वन विभागाची झोप उडवलेली असून नुकताच हफ्ताभराच्या मुक्काम सावली तालुक्यात ठोकलेल्या हत्तीने बफर झोन मध्ये जाऊन परत मोर्चा सावली तालुक्यात वडवल्याने वनविभागाची चांगली तारांबळ उडालेली आहे आज सुमारे सहाच्या वाजता दरम्यान सकाळी हत्तीचा कडप्प 20 ते 25 किमी सफर रात्रीला करीत सिरसी, साखरी मार्गे उमरी तलाव, परिसरातून, गव्हारला, उपरी परिसरात बिराड ठोकल्याने घनदाट जंगल असल्याने dron सुधा योग्य काम करत नसल्याने 6ते 7घंटे होऊन हत्ती जंगल परिसरातून बाहेर निघाले नाहीत त्यामुळे वनविभागाची डोके दुखी वाढली नेमका हती जाणार तरी कुठे असा प्रश्न सर्वांना पडलेला असून हत्तीच्या चकरा मुळे वन विभागाला नाकी नऊ आले .
हत्तीच्या रेस्क्यूअर DFO तलमले, एसीएफ तडसे, वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धूर्वे ,उपक्षेत्र सहाय्यक नरेंद्र शिडाम, मारोती पूल्लेवाड ,आर आर यु टीम , बीट वनरक्षक आणि सर्व वन कर्मचारी या ठिकाणी हत्तीच्या रेस्क्यूअर नजर ठेवून काम सुरू केले असून नागरिक सतर्क राहावे, जीवितहानी टळावे करिता फलक व माहिती देण्याचे वनविभाग काम करीत आहे मात्र हत्तीचा मुक्काम कुठे हा सवाल अजूनही निर्माण झालेला आहे मात्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना आता हत्ती शोधण्याची मोहीम राबविण्यात अडचण निर्माण होत आहे


