
अरुण बारसागडे , उपसंपादक, न्यूज जागर चंद्रपूर
घुग्घुस येतील इंदिरानगर परिसरातील पाच तरुण रविवारी दुपारी सुमारास 1 वाजता वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेल्यानंतर बेपत्ता झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने नदीत बुडल्याची भीती व्यक्त होत आहे.
शिव केळझरकर वय 19, सनी आसामपिल्ली वय 19, समय सोनटक्के वय 17, तनय पावडे वय 19 आणि रोहित बास वय 19 अशी बेपत्ता तरुणांची नावे आहेत

घटनेची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक नागरिक आणि SDRF जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. नदीकाठी तरुणांचे मोबाईल, कपडे व चपला सापडल्याने त्यांच्या पाठीवरूनच शोध सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण वाहून गेले असावेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शोधमोहीम रात्रभर सुरू होती. बातमी लिहेपर्यंत कोणताही ठावठिकाणा नव्हता.

