
भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी सह अन्य मान्यवारांची विशेष उपस्थिती
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली
मुंबई, दि. ०९ जून : जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादनाचा भव्य कार्यक्रम मंगळवार, दि. ०९ जून २०२६ रोजी लोक भवन, मलबार हिल, मुंबई येथे मोठ्या उत्साहात व आदरभावाने संपन्न झाला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री नरहरी झिरवाळ, यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या अभिवादन सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या १५० हून अधिक आदिवासी कलाकारांनी आपल्या पारंपरिक कला, संस्कृती आणि लोकपरंपरेचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्षमय जीवनकार्याला व आदिवासी समाजाच्या स्वाभिमानाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी, राज्यसभा खासदार मायाताई इवनाते, आमदार संजय पुराम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार राजू तोडसाम, आमदार आमश्या पाडवी, आमदार दिलीप बोरसे, आमदार केवळराम काळे, माजी खासदार अशोक नेते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या राष्ट्रनिष्ठ, स्वातंत्र्यप्रेमी आणि आदिवासी समाजाच्या हक्कांसाठीच्या महान कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला.
भगवान बिरसा मुंडा यांचे बलिदान आणि त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय योगदान हे भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

