
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली दि.९ जुन:
आदिवासी समाजाचे जननायक, स्वातंत्र्यसंग्रामातील महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आ. रामदास मसराम यांच्या जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी आमदार रामदास मसराम यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. जल, जंगल, जमीन आणि आदिवासी अस्मितेच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेल्या संघर्षमय कार्याला आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे, माजी सभापती परसराम टिकले, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष (देसाईगंज) राजेंद्र बुल्ले, माजी उपसभापती नितीन राऊत, धनपाल मिसार सर, नगरसेवक तथा गटनेता विकास प्रधान, नगरसेविका आशाताई दहिवले, नगरसेविका गुरमीतकौर चावला, नगरसेविका मंदा समर्थ, नगरसेविका राधिका पत्रे, विलास बन्सोड, कमलेश बारस्कर, इलियास पठाण, सागर वाढई, परशुराम ठाकरे, रजनीकांत मोटघरे, रुपेश टिकले, राधेश्याम पत्रे, शरीफ शेख, बबलू शेख, शादीफ शेख, गिरिधर नैताम, शंकर राऊत, गजानन घरत आदी मान्यवर उपस्थित होते.

